Lok Sabha Elections 2019: 'गरीबी पर वार, 72 हजार' म्हणत राहुल गांधी यांनी सादर केला काँग्रेसचा जाहीरनामा

लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीत सर्व राजकीय पक्ष असताना काँग्रेसने निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा सादर केला आहे.

बातम्या Darshana Pawar|
Lok Sabha Elections 2019:  'गरीबी पर वार, 72 हजार' म्हणत राहुल गांधी यांनी सादर केला काँग्रेसचा जाहीरनामा
Congress President Rahul Gandhi unveils manifesto for 2019 Lok Sabha elections (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीत सर्व राजकीय पक्ष असताना काँग्रेसने निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा सादर केला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh), काँग्रेस चेअरमन सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा सादर करण्यात आला.

'जन आवाज' असे या जाहीरनाम्याचे नाव असून यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर गरीबांसाठी न्याय लागू करण्यात येणार असून दरवर्षी गरीबांच्या खात्यात 72 हजार रुपये जमा केले जातील. यावेळी राहुल गांधी यांनी 'गरीबी पर वार 72 हजार' अशी घोषणाही केली. काँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा

जाहीरनाम्यात शेतकरी, नोकरदारांना प्राधान्य देण्यात आले असून 10 लाख बेरोजगार तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देण्यात येईल. तसंच व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवकांना पहिली तीन वर्ष कोणत्याही परवानग्या घेण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार असा दावा करत जाहीरनाम्यातील कोणतीही घोषणा खोटी नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस पक्षाचे ट्विट:

पहा व्हिडिओ:

जाहीरनाम्यात शिक्षण आणि आरोग्यावर भर देण्यात आला असून 6% पैसा शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. तसंच गरीब नागरिकांना मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

जाहीरनामा सादर करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप100446-0' width='728' height='90'>

जाहीरनामा सादर करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपाने देशाची विभागणी केली मात्र काँग्रेस देशाला एकत्र आणेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

Comments
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस