अमेठी: काँग्रेस पक्षाला मत देण्यासाठी महिलेवर दबाव, व्हिडिओ व्हायरल (Video)
प्रतिकात्मक फोटो (FILE PHOTO)

लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान आज (6 मे) पार पडत आहे. यामध्ये 7 राज्यातील 51 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात दिग्गज राजकरणी नेत्यांचे नशीब एव्हीएम (EVM) पेटीत आज बंद होणार आहे. त्यामधील अमेठी (Amethi) येथील जागेवरील होणारे मतदान फार महत्वपूर्ण आहे. अमेठी येथून काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (rahul Gandhi) यंदा निवडणूक लढवत आहेत. तर राहुल गांधी यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून (BJP) स्मृती ईराणी (Smriti Z Irani) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु आज मतदान पार पडत असताना एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये महिलेला जबरदस्तीने भाजप ऐवजी काँग्रेसला मत द्यायला लावले आहे.

वृद्ध महिला अमेठी येथे मतदान करण्यासाठी आली. त्यावेळी तिला जबरदस्तीने मतदान करताना काँग्रेस पक्षाला मत द्यायला लावल्याचा प्रकार घडल्याचे वृद्ध महिलेने सांगितले आहे. परंतु महिलेला भाजप पक्षाला मत द्यायचे असल्याचे महिलेने स्पष्ट केले आहे. त्याचसोबत महिलेने असे म्हटले आहे की, मतदान कक्षेत तिचा जबरदस्तीने हात पकडून भाजप ऐवजी काँग्रेस पक्षाच्या बटणावर क्लिक करण्यास तिला भाग पाडले आहे.(Lok Sabha Election 2019 Phase 5 Voting: देशातील 7 राज्यांत पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु)

गौरीगंज मधील गूजरटोला बूथ क्रमांक 316 येथे हा प्रकार घडला आहे. तसेच पीठासन अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने हात पकडून काँग्रेसला मतदान करण्यास भाग पाडले आहे. तर स्मृती ईराणी यांनी सु्द्धा या प्रकारावर आक्षेप घेतला असून राहूल गांधी बुथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.