Lok Sabha Election 2019 Phase 5 Voting: लोकसभा निवडणूक 2019 च्या पाचव्या टप्प्यात (5th Phase Voting) देशातील 7 राज्यांत मतदान सुरु झाले आहे. ह्या टप्प्यात आज 7 राज्यांतील 51 जागांसाठी मतदान होणार आहे. ह्यात 14 जागा उत्तर प्रदेश, 12 जागा राजस्थान, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी सात जागांसाठी मतदान होईल. तर बिहार मध्ये 5 आणि झारखंडमध्ये 4 जागांसाठी मतदान होईल. जम्मू काश्मीरच्या लडाख जागेसाठी आणि अनंतनाग जागेसाठी पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने 94 हजार मतदान केंद्र तयार केले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.
How To Vote #India Google Doodle: 5 व्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान कसे करावे #भारत खास गूगल डुडल
गृहमंत्री आणि लखनऊ बीजेपीचे उमेदवार राजनाथ सिंह यांनी स्कॉलर्स होम शाळेमध्ये जाऊन मतदान केले. तसेच हजारीबागमध्ये पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि त्यांच्या पत्नी नीलिमा सिन्हा यांनी देखील मतदान केले.
ANI Tweet
Home Minister and Lucknow BJP Candidate Rajnath Singh casts his vote at polling booth 333 in Scholars' Home School pic.twitter.com/BXSZTvFeGS
— ANI UP (@ANINewsUP) May 6, 2019
लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election 2019) च्या ह्या पाचव्या टप्प्यात 8.75 करोड मतदार 674 उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत. उत्तर प्रदेशात १४ जागांसाठी दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार टक्कर होणार आहे, ज्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.