LS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान
Lok Sabha Elections 2019 | (Photo Credits: ANI/Twitter)

Lok Sabha Elections 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्रासह देशभरात आज 95 मतदार संघांमध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. यामध्ये महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर येथे मतदान पार पडले. दिवसाअखेर महाराष्ट्रामध्ये 61.22% इतके मतदान झालं आहे. Lok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल

ANI ट्विट 

महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह देशस्तरावर एच डी देवगौडा, काँग्रेस नेते एम वीरप्पा मोइली (राज बब्बर), नॅशनल कॉन्फ्रेंस अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, भाजप नेते हेमा मालिनी यांच्या राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.