Narendra Modi and Rahul Gandhi (PHoto Credits-PTI)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2019) प्रचारसभेत बोलताना अनेक राजकीय मंडळी एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करताना दिसत आहे. कांग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील नुकतंच इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) खरमरीत टीकास्त्र सोडली आहेत. "मोदींची प्रतिमा हीच त्यांची ताकद आहे, आणि मी ती खराब करेनच, आणि याची सुरवात झालेली आहे" असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. या मुलाखतीत राहुल गांधींनी निवडणुकीच्या प्रचार उद्दिष्टांबद्दल सांगताना, आपण देशातील तरुणांना नोकरी, शेतकऱ्यांसाठी योजना व गरिबी यांना महत्व देत आहोत असेही स्पष्ट केले.

राफेल  प्रकरणाबद्दल राहुल यांनी पुन्हा एकदा मोदींवर झोड घेत, या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे, एका अनानुभवी कंपनीला एकाएकी इतकं मोठं कंत्राट देण्यात मोदींचा स्वार्थ आहे, सर्व नियम धाब्यावर बसवत मोदींनी अनिल अंबानी यांना 30 कोटींचा फायदा करून दिला आहे असाही आरोप लावला. राफेल घोटाळा टेप: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब याशिवाय सर्जिकल स्ट्राईक वर देखील टीका करत, मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत आम्ही देखील तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करून आणले मात्र याचा कधीही बोभाटा केला नाही, कारण सेनेच्या शोर्यावर निवडणूक लढवणे गैर आहे असे मत राहुल गांधीनी व्यक्त केले.

राहुल यांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपा सत्तेत निवडून येणं शक्य नाही, त्यामुळे यंदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालीही युपीए सरकारच निवडून येईल असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

खरतर आपल्या सभांमध्ये पंतप्रधानांवर आरोप वजा विधाने करण्याची राहुल गांधींची ही काय पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील चौकीदार चोर है या वाक्यामुळे काँग्रेस अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, त्यानंतर गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी आणि यापुढे असे वक्तव्य करणार नाही असे आवाहन द्यावे अशी मागणी भाजपा तर्फे करण्यात आली होती. मात्र राहुल गांधी आहेत की जे कशालाही न जुमानता आपल्या प्रत्येक सभांमध्ये अशी विधाने करताना पाहायला मिळतायत. Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीवर राहुल गांधी यांचा शेरोशायरीतून निशाणा

यंदा राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन ठिकाणांहून निवडणूक लढवणार आहेत,अमेठीतुन हरण्याची मला अजिबात भीती नाही असा विश्वास  राहुल यांनी मुलाखतीत दर्शवला.

आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे सुरळीत पार पडले आहेत, यापुढे 6 मे ला देशातील सात राज्यातील 51 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल सह बिहार मध्ये यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि स्मृति इराणी यांच्यात मतांची लढत पाहायला मिळणार आहे.