Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ह्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मुलाखात घेतली. या मुलाखतीच्या काही छोट्या-छोट्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच मुलाखती दरम्यान मोदी यांना विविध प्रश्न अक्षयने विचारले आहेत. त्यानंतर आता काँग्रेस (Congress) पक्ष अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावरुन मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, 'हकीकत रूबरू हो, तो अदाकारी नहीं चलती. जनता के सामने, चौकीदार...मक्कारी नहीं चलती.' तसेच चौकीदार चोर असल्याचा हॅशटॅग सुद्धा या ट्वीटमध्ये वापरण्यात आला आहे. तर आता पर्यंत देशात तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे.
हकीकत रूबरू हो तो
अदाकारी नहीं चलती।
जनता के सामने, चौकीदार
मक्कारी नहीं चलती।#ChowkidarChorHai pic.twitter.com/vDJNz4uUWu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 24, 2019
(अक्षय कुमार याने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत; पहा Videos)
दरम्यान भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी काँग्रेसला प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, नरेंद्र मोदी यांची मुलाखत लक्षपूर्वक पाहण्याऐवजी काँग्रेसने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काँग्रेसकडून नेहमीच नकारात्मक गोष्टी बोलल्या जातात. मोदी यांनी मुलाखतीत समाज, राष्ट्र आणि व्यक्तिगत गोष्टींवर बातचीत केली आहे. तसेच कोणत्याही पक्षाबद्दल टीका केली नसल्याचे ही नकवी यांनी म्हटले आहे.