'चौकीदार चोर है' या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायलयात व्यक्त केली दिलगिरी
Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राफेल मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना 'चौकीदार चोर है', असे विधान वारंवार केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान तर 'चौकीदार चौर है' हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. आता मात्र राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात 'चौकीदार चोर है' या विधानावरुन दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात आवेशात मी हे विधान केले होते, असे स्पष्टीकरण  राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. (राजधानी दिल्लीत 'चौकीदार ही चोर'चा थ्रीलर ; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर हल्ला)

राफेल डील प्रकरणात फेरविचार याचिकेवरील सुनावणीवर सर्वोच्च न्यायलयाने निर्णय दिल्यानंतर राहुल गांधी यांनी एका रॅलीत राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, "आता तर सर्वोच्च न्यायालयाने ही चौकीदार चौर असल्याचे मान्य केले." राहुल गांधी यांच्या या विधानानंतर भाजपच्या खासदार मीनाक्षी लेकी (Meenakashi Lekhi) यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात कोर्टात अपमान याचिका दाखल केली होती. (चौकीदार चिडले, राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाईची मागणी; ‘चौकीदार चोर है' विधानावर आक्षेप)

ANI ट्विट:

मीनाक्षी लेकी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे सांगत राहुल गांधींना नोटीस बजावली. नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधी यांनी आज (सोमवार, 22 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडत दिलगिरी व्यक्त केली.