चौकीदार चिडले, राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाईची मागणी; ‘चौकीदार चोर है' विधानावर आक्षेप
PM Narendra Modi and Rahul Gandhi | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Lok Sabha elections 2019: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' (Chowkidar Chor Hai) असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशभरातील सभांमधून राहूल गांधी ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा उल्लेख करत आहेत. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने उल्लेख करत असलेले‘चौकीदार चोर है’ हे वाक्य महाराष्ट्रातील चौकीदारांना मात्र आवडले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक (Security Guard ) संघटनेने (Maharashtra Security Guard Arganization) राहुल यांच्या या सतत्याच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. तसेच, या संघटनेने केवळ आक्षेप घेत न थांबता चक्क राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्या भाषणाच्या माध्यमातून राहूल गांधी सातत्याने ‘चौकीदार चोर है’ची घोषणा देतात. त्याला उपस्थीत लोकांकडूनही तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो. हा प्रतिसाद पाहून राहुल गांधी परत आक्रमकपणे भाषण करताना ‘चौकीदार चोर है’ची घोषणा देतात. दरम्यान, सुरक्षा रक्षक संघटनेचे म्हणणे असे की, राहुल गांधी यांनी एमएमआरडीए ग्राऊंडवर नुकत्याच पार पडलेल्या सभेदरम्यान (1 मार्च) अनेकदा ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. तसेच, लोकांकडूनही या घोषणा देऊन घेतल्या. (हेही वाचा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार, ‘पुलवामासारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो’ या विधानावर घेतला आक्षेप)

सुरक्षा रक्षक संघटनेचे संदीप घुघे यांनी सांगितले की, पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करावी. त्यांनी सर्व चौकीदारांचा अपमान केला आहे. पोलिसांनी कारवाई केली तर भविष्यत तरी चौकीदारांचा अपमान होणार नाही.