मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार, ‘पुलवामासारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो’ या विधानावर घेतला आक्षेप
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे | (Photo Credits- Facebook )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(MNS) तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर खास शौलीत तोफ डागली. त्यांच्या एकूण भाषणाचा रोख केंद्र सरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कार्यपद्धतीवर होता. या भाषणादरम्यान, त्यांनी भारताने पाकिस्तानात केलेल्या सर्जिक स्ट्राईकवरुन (Surgical Strike) आक्रमकपणे प्रश्न उपस्थित केले. भाषणावेळी बोलताना त्यांनी ‘पुलवामासारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो’असेही वक्तव्य केले. ठाकरे यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार एस बालकृष्णन (S Balakrishnan) यांनी तक्रार पोलिसांत तक्रार केली आहे.

पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील राज ठाकरे यांच्या भाषणाची देशभरात चर्चा आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सोशल मीडियातूनही जोरदार चर्चा केली जात आहे. तसेच, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहे. दरम्यान, ही चर्चा असतानाच आपल्या वक्तव्यामुळे राज ठाकरे अडचणी येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत एस बालकृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात (Chembur Police Station) तक्रार नोंदवली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

आपल्या भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, निवडणुकांच्या आधी किंवा निवडणुकांचे टप्पे सुरु असताना पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल. (हेही वाचा, निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल: राज ठाकरे)

 'राज ठाकरे हे  एका पक्षाचे जबाबदार अध्यक्ष आहेत'

दरम्यान, राज ठाकरे हे सर्वसामन्य व्यक्ती नसून ते एक नेते आणि एका पक्षाचे जबाबदार अध्यक्ष आहेत. त्यामळे त्यांची वक्तव्ये ही समाजात गांभीर्याने घेतली जातात. त्यांनी एस बालकृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात ' पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल' असे केलेले वक्तव्य हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आपण तक्रार केल्याचे बालकृष्णन यांनी म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारीचे पुढे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, राज ठाकरे किंवा मनसेकडून या तक्रारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.