महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आज ( 9 मार्च ) 13 वा वर्धापनदिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रंगशारदा (Rangsharda Hall) सभागृहामध्ये कार्यकर्त्यांसाठी खास सभा आयोजित केली होती. राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता होती. येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे आगामी निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र लोकसभा निवडणूक (lok Sabha Election) लढवण्याबाबत तसेच कोणत्या पक्षाला पाठींबा द्यायचा हा निर्णय मी लवकरच घेईन आणि त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असे सांगितले. मात्र या सभेत राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील जर काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 9, 2019
मी आज एक गोष्टीची भीती व्यक्त करतोय, की निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल#RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 9, 2019
सरकार शहिद जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण करत आहे. असे म्हणत भाजप सरकार पुलवामा दहशतवादी हल्ला, एअर स्ट्राईक यांचा वापर भाजप सरकार आगामी काळात राजकीय खेळी खेळण्यासाठी करू शकतो त्यामुळे सावध राहा. तुमच्या समोर येणाऱ्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा विचार करा. असा सल्ला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आगामी निवडणुकांना सामोरी जाताना केवळ मतांवर लक्ष ठेवून हे सरकार पुलवामाप्रमाणे एखादा हल्ला पुन्हा घडवून आणू शकतो. असा खळबळजनक दावा देखील राज ठाकरे यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक कोट्या करून टीका केली. मोदींसोबतच या सभेमध्ये राज ठाकरे यांनी अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरही टीका केली. ' जर शहांच्या माहितीनुसार 250-300 दहशतवादी जर मारले तर अभिनंदन परत कसा आला? अवघे १० जण जरी मारले असते तरी विंग कमांडर भारतामध्ये जिवंत परत येऊ शकला नसता असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपा सरकार तुमच्या कमजोर स्मरणशक्तीचा फायदा घेत पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणार पण तुम्ही वेळीच सावध व्हा आणि लोकांनाही या गोष्टी समजावून सांगा असे राज ठाकरे म्हणाले. सोशल मीडियावर मनसेला ट्रोल करणाऱ्यांना फटकावून काढा असाही आदेश दिला