अक्षय कुमार याने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मुलाखत; पहा Videos
Narendra Modi & kshay Kumar (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची खास मुलाखत घेतली आहे. अक्षय कुमार याने इन्स्टाग्रामवर या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत अक्षय कुमार पंतप्रधान मोदींना काही प्रश्न विचारत आहे. यात राजकारणाशी निगडीत एकही प्रश्न नसून सर्व अनौपचारिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. या मुलाखतीचे काही व्हिडिओज एएनआयने ट्विटरवर शेअर केले आहेत.

ANI ट्विट:

अक्षय कुमार याने शेअर केलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रीट्विट केला आहे. यात त्यांनी लिहिले की, "तुमच्यासोबत राजकारण आणि निवडणूक हे विषय सोडून इतर विषयांवर चर्चा करताना खूप छान वाटले. मला विश्वास आहे की, लोकांना आपल्या गप्पा आवडतील."