Lakhimpur Kheri Violence Case: लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणी आशिष मिश्रा याला जामीन मंजूर
Ashish Mishra (Photo Credit- Twitter)

लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणी (Lakhimpur Kheri Violence Case) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून (Allahabad High Court) जामीन (Bail) मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या निंदनीय विधानात आणि तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. हत्याकांड प्रकरणात एसआयटीने (SIT) आरोपपत्र दाखल केले होते. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले होते.

Tweet

आशिष मिश्रासह एकूण 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आशिष मिश्रासह अन्य आरोपींना हत्येचा आरोपी बनवले आहे. आरोप पत्रानुसार सुनियोजित कटाखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीप आणि एसयूव्हीने चिरडले. (हे ही वाचा Uttar Pradesh Elections 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक फेझ 1 च्या आजच्या मतदानात दुपारी 1 वाजेपर्यंत 35.03% मतदान)

208 जणांनी दिली साक्ष 

तपासात, एसआयटीला सगळे पुरावे आणि 24 व्हिडिओ फोटो सापडले, ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या. याशिवाय 208 जणांनी साक्ष दिली. या आधारे एसआयटीने आरोपपत्र लिहून ठेवले आहे. मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.