Karnataka Chief Minister HD Kumaraswamy (Photo Credits: IANS)

कर्नाटक (Karnataka) मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं आहे. काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांच्या सरकारमधील काँग्रेसच्या 21 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यानंतर कुमारस्वामी यांना सरकार टिकवायचे असल्यास त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार होते. मात्र बहुमत सिद्ध करण्यात अपशयी ठरलेल्या कुमारस्वामी यांना मोठा धक्का बसला आहे. (कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना येत्या 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत)

कर्नाटक विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं 99 आमदारांनी मतदान केलं. तर 105 मतं सरकारच्या विरोधात गेली. त्यामुळे आता कुमारस्वामींना सत्ता सोडावी लागेल. त्यामुळे यापुढे कर्नाटकात होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ANI ट्विट:

सरकार कोसळल्यानंतर भाजपाकडून आंनदोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. विधानसभेबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणबाजी केली. तर सभागृहात माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी विजयाची निशाणी दाखवत जल्लोष केला. भाजपा पुढील दोन दिवसात राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

ANI ट्विट:

बंगळुरुमध्ये आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 48 तासांसाठी कलम 144 लागू करण्यात आले. त्याचबरोबर बंगळुरुमधील सर्व पब, दारुची दुकाने 25 तारखेपर्यंत बंद राहतील. तसंच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस कमिश्नर अलोक कुमार यांनी दिली आहे.