हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिली 'जय संयुक्त महाराष्ट्र' अशी घोषणा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडाळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न विरोधीपक्षातील नेत्यांकडून वारंवार विचारण्यात येत होता. यातच आज 30 डिसेंबर रोजी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी घेतलेल्या शपथकडे सर्वांचे केंद्रीत झाले आहे. सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावरील वादावरुन दोन्ही राज्यात अशांतता पसरली आहे. यातच हसन मुश्रीफ यांनी शपथ विधीच्या अखेरिस जय संयुक्त महाराष्ट्र विधान केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर मंत्रिपदाचा कारभार सोपण्यात आला आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी शपथ विधी घेत असताना जय संयुक्त महाराष्ट्र असे विधान करुन सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अतिशय गंभीर होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधील नागरिक एकमेकांच्या विरोधात आवाज उठवत असल्याचे समोर आले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातही कन्नड लोक राहतात हे लक्षात ठेवा- अरविंद सावंत

ट्वीट-

बेळगावमध्ये भाषिक मुद्यावरुन वातावरण तापल्यामुळे खबरदारी म्हणून कोल्हापूरहून कर्नाटकच्या दिशेने ये- जा करणारी बस सेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर ते कर्नाटक आणि कर्नाटक ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सीमा प्रश्नाच्या वादाचा फटका बस सेवेला बसू नये, यासाठी प्रशासनाकडून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.