गुजरात विधानसभा निवडणुकीचं (Gujarat Assembly Election 2022) पहिल्या टप्प्याचं मतदान गेले दोन दिवसांपूर्वीचं आटोपलं असुन आज दुसऱ्या आणि अंतीम टप्प्याचं मतदार होणार आहे. विविध पक्षाच्या उमेदवारांच्या शर्तीच्या प्रयत्नांना नंतर जनता नेमका कुणाला कौल देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आज म्हणजेचं अंतीम टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता पासून मतदान सुरु झाला असुन संध्याकाळी पाच पर्यत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर अशा एकूण १४ जिल्ह्यातील मतदान पार पडणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुक (Gujarat Assembly Election) ही देशातील महत्वाच्या निवडणुकांपैकी एक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) देखील आज मतदानाचा हक्क बजावणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election 2022) भाजप (BJP), कॉंग्रेस (Congress) आणि आप (AAP) या तिन पक्षात मोठी लढत बघायला मिळत आहे. तरी जनता कोणाला कौल देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. गुजरात भाजप (Gujarat BJP) उमेदवारांसाठी खुद्द पंतप्रधान मोदी (PM Modi), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी खुद्द मैदानात उतरत प्रचार केला होता. तरी आप चे सर्वोसर्वे अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी देखील १०० टक्के आपल्या जोरावर प्रचार करताना दिसले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून (Bharat Jodo Yatra) गुजरातला वगळलं असलं तरी गुजरात कॉंग्रेसने (Gujarat Congress) प्रचारासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. (हे ही वाचा:- Gujarat Election 2022: 'महिलांनी निवडणूक लढवणे हे इस्लामच्या विरोधात'; गुजरातमध्ये शाही इमामच्या वक्तव्याने नवा वाद (Watch))
भाजप (BJP), कॉंग्रेस (Congress), आप (AAP) बरोबरचं एनसीपी (NCP), बीटीपी (BTP), बीएसपी (BSP) देखील गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election 2022) मैदानात उतरलं आहे. 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2.54 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. 26,409 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून सुमारे 36,000 ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जवळपास 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार नशीब अजमावत आहेत.