गुरुवारी काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यात मजेदार 'ट्विट वॉर' (Tweet War) पाहायला मिळाले. एकीकडे शशी थरूर यांनी लोकसभेचा (Loksabha) फोटो पोस्ट करताना आठवले यांचा उल्लेख केला, तर काही वेळाने केंद्रीय मंत्र्यांनीही थरूर यांना योग्य इंग्रजीत लिहिण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार थरूर इंग्रजी भाषेवरील प्रभुत्तवासाठी ओळखले जातात. शशी थरूर यांनी गुरुवारी लोकसभेचा एक फोटो ट्विट केला, ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) सर्वसाधारण अर्थसंकल्पासंबंधी माहिती देताना दिसत आहेत. फोटोत दिसत असलेल्या आठवलेंच्या हावभावातून शशी थरुर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले की, जवळपास दोन तास 'बजेट डिबेट'वर विसंबून राहिल्यानंतर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांनादेखील विश्वास वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगून जात असल्याचे थरूर यांनी म्हटले.
Tweet
Nearly two-hour rely to the Bydget debate. The stunned & incredulous expression on Minister @RamdasAthawale’s face says it all: even the Treasury benches can’t believe FinMin @nsitharaman’s claims about the economy & her Budget! pic.twitter.com/wOGY7TJYg8
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 10, 2022
त्यावर आठवले यांनीही काँग्रेस नेत्याला प्रत्युत्तर देत 'बजेट' हा शब्द सुधारण्याचा सल्ला दिला. त्यांनी लिहिले, 'प्रिय शशी थरूर जी, ते म्हणतात की अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणारच आहेत.' ते पुढे म्हणाले, 'ठीक आहे, आम्हाला समजले.' मात्र, हे एवढ्यावरच थांबले नाही. (हे ही वाचा Rahul Gandhi on PM Narendra Modi: राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येते हसू, म्हणाले 'मी त्यांना घाबरतही नाही')
Tweet
Dear Shashi Tharoor ji, they say one is bound to make mistakes while making unnecessary claims and statements.
It’s not “Bydget” but BUDGET.
Also, not rely but “reply”!
Well, we understand! https://t.co/sG9aNtbykT
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 10, 2022
केंद्रीय मंत्र्यानंतर थरूर यांनीही उत्तरात आपली चूक मान्य केली होती. टायपिंगमधील चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'बेफिकीर टायपिंग हे वाईट इंग्रजीपेक्षा मोठे पाप आहे..!'