काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधांनी देशातील लघू, मध्यम आणि सुक्ष्म व्यवसाईकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यांच्या निर्णयांमुळे देशाची स्थिती प्रचंड बिकट झाली आहे. मी त्यांना घाबरत नाही. उलट त्यांचा उद्धटपणा पाहून मला हसू येते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणूक प्रचारादम्यान ते दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी हरिद्वार जिल्ह्यातल्या मंगलौरमध्ये प्रचारसभेच्या माध्यमतून नागरिकांशी साधला. या संवादात त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीबाबत आणि पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणाबद्दल विचारले असता राहुल गांधी म्हणाले. संसदेमध्ये पंतप्रधान पूर्ण वेळ काँग्रेसवर बोलले. मात्र, मी त्यांना चीनबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तरच दिले नाही. (हेही वाचा, Pension Scheme: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 'या' महिलांना प्रति महिना मिळणार 2250 रुपये)
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी जे काही ऐकत नाही त्याच्यावर मी का स्पष्टीकरण देणार असे राहुल गांधी यांना उद्देशुन म्हटले होते. यावर राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधांनी काय सांगितले आपण ऐकले का? ते म्हणाले राहुल गांधी काही ऐकत नाहीत. याचा अर्थ असा की राहुल गांधी यांच्यावर ईडी किंवा सीबीआयचा दबाव काम करत नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर कितीही दबाव टाकला तरीही ते मागे जात नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही संभागृहामध्ये काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देशातील परिस्थितीवर आणि अनेक मुद्द्यांना त्यांनी पंतप्रधान नेहरु यांना जबाबदार धरले. इतकेच नव्हे तर काँग्रेसने सत्तेत असताना कशी दडपशाही केली याबाबत अनेक उदाहरणेही त्यांनी दिली.