Pension Scheme: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 'या' महिलांना प्रति महिना मिळणार 2250 रुपये
PM Narendra Modi | (Photo Credits: IANS)

Pension Scheme: मोदी सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लोकांना खास सुविधा दिल्या जातात. अशातच आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये देशातील महिलांना प्रति महिन्याला पैसे मिळणार आहेत. सरकारच्या या योजनाअंतर्गत राज्यानुसार पैसे दिले जातात.(Unemployment and Bankruptcy Suicides: 2018 ते 2020 या काळात कर्जबाजारीपणामुळे 16,000 हून अधिक, तर बेरोजगारी मुळे 9140 लोकांनी केल्या आत्महत्या)

सरकारच्या विधवा पेंन्शन योजनेत सरकारकडून आर्थिक बिकट परिस्थिती असलेल्या महिलांना मदत केली जाते. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला पेंन्शची रक्कम दिली जाते. याचा फायदा फक्त दारिद्र रेषेखालील विधवा महिलांना मिळणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही महिलांना सरकारकडून हे अनुदान दिले जाणार नाही आहे. अर्ज करमारी महिलेचे वय 18-60 वर्षादरम्यान असावे.(Revised Guidelines for International Arrivals in India: भारतामध्ये येणार्‍या परदेशी नागरिकांसाठी आता ‘At-Risk’ देशांची वर्गवारी नसेल; 14 फेब्रुवारी पासून असतील 'हे' नवे नियम)

हरियाणा सरकार प्रति महिन्याला 2250 रुपये देते. याचा फायदा फक्त अशा महिलांना मिळतो ज्यांचे आर्थिक उत्पन्न 2 लाख रुपये आहे. तर उत्तर प्रदेशातील सरकार या योजनेत महिलांना 300 रुपये प्रति महिना देते. यामधील पेन्शनची रक्कम थेट खातेधारकांच्या खात्यात जमा केली जाते.

या व्यतिरिक्त अन्य राज्य म्हणजे महाराष्ट्रात 900 रुपये, राजस्थान मध्ये 750 रुपये, दिल्लीत 2500 रुपये, गुजरात 1250 रुपये, उत्तराखंड मध्ये 1200 रुपये प्रति महिना दिले जातात. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे आधार कार्ड, नवऱ्याचे मृत्यूपत्र, राहत्या घराचे प्रमाण पत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट साइज फोटो असावा.