Revised Guidelines for International Arrivals in India: भारतामध्ये येणार्‍या परदेशी नागरिकांसाठी आता ‘At-Risk’ देशांची वर्गवारी नसेल; 14 फेब्रुवारी पासून असतील 'हे' नवे नियम
Passengers at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai (Photo Credit: PTI)

भारताप्रमाणे जगभरात कोविड 19 नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर आता देशातही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी काहीशी निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. आज (10 फेब्रुवारी) केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्स नुसार आता कोणताही देश हा ‘at-risk’ यादीमध्ये नसणार आहे. दरम्यान ओमिक्रॉनच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर जगातील 14 देश भारताने अ‍ॅट रिस्क यादीमध्ये टाकले होते त्या देशातून येणार्‍यांसाठी कठोर नियमावली होती.

केंद्र सरकारची नवी नियमावली आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 14 फेब्रुवारी पासून लागू असणार आहे. सध्या भारतासाठी कोणताच देश 'अ‍ॅट रिस्क' यादीमध्ये नसणार असल्याने भारतात आल्यानंतर सेल्फ मॉनिटरिंग साठी  14 दिवस करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  आता परदेशातून येणार्‍यांना 7 दिवस होम क्वारंटीन रहावं लागणार नाही.हे नक्की वाचा:  मुंबई शहर महिन्याअखेरी पर्यंत पूर्ण अनलॉक होईल; Mumbai Mayor Kishori Pednekar यांचे संकेत पण नागरिकांना त्यासाठी दिला 'हा' सल्ला!

इथे पहा नवी नियमावली

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 72 तास आधी केलेल्या आरटीपीसीआर रिपोर्ट्ची कॉपी अपलोड करण्याऐवजी आता कोविड 19 लसीकरणाचे शेड्युल देखील अपलोड करण्याचा पर्याय ऑनलाईन दिला जाणार आहे. अनेक देशांनी बुस्टर डोस मोठ्या प्रमाणात नागरिकांना दिला आहे. त्यामुळे आता विमानतळावर चाचणीची अट देखील शिथिल होणार आहे. काही निवडक लोकांचीच चाचणी होईल.

सध्या ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड देखील मार्च- एप्रिल महिन्यापासून प्रवाशांसाठी आपल्या बॉर्डर्स खुल्या करत आहे. यामुळे तब्बल 2 वर्षांनी भटकंती साठी हे देश पुन्हा खुले होणार आहेत.