दिल्ली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा शीला दीक्षित (Sheila Dixit) यांचे आज निधन झाले आहेत. तर वयाच्या 81 व्या वर्षात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.शीला दीक्षित या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास त्यांना कार्डिएट अरेस्ट आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांत हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आता दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाने नुकतीच त्यांच्यावर दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. काँग्रेस पक्षाच्या त्या अत्यंत जुन्या आणि जाणकार नेत्या होत्या. 1998 ते 2013 इतका प्रदीर्घ काळ त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.(Sheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन)
इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळापासून त्या काँग्रेस पक्षात सक्रीय होत्या. काँग्रेस पक्षावर त्यांची नितांत निष्ठा होती. या निष्ठेमुळेच त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री पद प्रदीर्घ काळ मिळाले असा त्यांच्यावर आरोपही होतो आणि याच वाक्यात त्यांचे कौतुकही केले जाते. काही राज्यांच्या त्या राज्यपालही होत्या.