आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांनी सरकारी फर्निचर, किंमती सामान नेले घरी
Kodela Sivaprasada Rao (Photo Credits-Twitter)

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव (Kodela Sivaprasada Rao) यांनी सरकारी फर्निचर आणि किंमती सामान घरी नेले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत राव यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना आपण केलेल्या प्रकाराची कबुली दिली आहे. यामध्ये राव यांनी सरकारी कार्यालयामधील टेबल, लाकडी खुर्च्या, सोफा, स्प्लिट एसी, टॉवर एसीस कॉम्युटर, प्लास्टिक खुर्चा अशा विविध गोष्टी पळवल्या होत्या. मात्र राव यांच्या घरी सुद्धा चोरी झाली होती. त्यात कार्यालयामधून पळवलेले कम्युटर चोरांनी लांबवले होते.

राव यांनी सरकारी कार्यालयामधील आणलेल्या वस्तू या चोरांपासून बचाव करण्याठी किंवा खराब होऊ नयेत म्हणून घरी आणल्याचा दावा केला. त्याचसोबत काही किंमती वस्तू राव यांनी मुलाच्या बाईक ठेवण्याचा जागी ठेवण्यात आल्या. राव यांच्या या वागण्याचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्याचसोबत वस्तू चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या पक्षाने सुद्धा केला आहे. तसेच या प्रकारानंतर विधानसभेचे मुख्य अधिकारी गणेश बाबू यांची तत्काळ बदली करण्यात आली.(दिल्ली विद्यापीठात वीर सावरकर यांच्या पुतळ्याची NSUI कार्यकर्त्यांकडून विटंबना, ABVP ने केली कठोर कारवाईची मागणी Watch Video)

तसेच अमरावती येथे विधीमंडळाचे काम पूर्ण झाल्यानंतर घरी आणलेले सामान परत करणार असल्याचे ही राव यांनी म्हटले आहे. याबबात 7 जून रोजी विधीमंडळाच्या सचिवांना पत्र लिहून माहिती सुद्धा दिली होती. मात्र सरकारने जर या वस्तूंची किंमत सांगितल्यास त्या वस्तू खरेदी करण्यास तयार असल्याचे राव यांनी म्हटले आहे.