Jharkhand: हजारीबाग येथे डीआयजीच्या निवासस्थानी कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

Jharkhand: झारखंडमधील हजारीबाग येथील डीआयजी (पोलीस उपमहानिरीक्षक) यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने बुधवारी सकाळी सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेतली, दरम्यान, त्याचा जागीच मृत्यू झाला. विकास कुमार असे मृत हवालदाराचे नाव समोर आले असून तो या जिल्ह्यातील तातीझारिया पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होता. ही घटना प्रेम संबंधातून  झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, मात्र नंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तेव्हापासून तो तणावात होता.

पहाटे गोळीबाराच्या आवाजाने डीआयजी निवासस्थानात गोंधळ उडाला. तेथे तैनात असलेल्या उर्वरित जवानांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.