India Today-Axis My India च्या अंदाजानुसार, भाजपाला सर्वाधिक 41 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2017 च्या तुलनेत भाजपाच्या जागा कमी झाल्या असल्या तरीही त्यांच्याकडे सर्वाधिक जागा असतील.

टाईम्स नाऊ च्या अंदाजानुसार कॉंग्रेस-भाजपा मध्ये कांटे की टक्कर असण्याची शक्यता आहे. 

Today's Chanakya च्या अंदाजाअनुसार भाजपाला सर्वाधिक 41% मतं  असल्याचा दावा आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसला 34% आणि इतर पक्षांना 25% मतदान झाल्याचा अंंदाज  आहे.  

ABP-C Voters च्या अंदाजानुसार उत्तराखंड मध्ये कॉंग्रेस कडे सर्वाधिक जागा  असतील.कॉंग्रेस कडे 32-35 जागा, भाजपाकडे 26-32, आप 0-2 तर इतर 3-7 जागेवर असतील.  

ABP-C Voters च्या अंदाजानुसार उत्तराखंड मध्ये कॉंग्रेस कडे सर्वाधिक जागा  असतील.कॉंग्रेस कडे 32-35 जागा, भाजपाकडे 26-32, आप 0-2 तर इतर 3-7 जागेवर असतील.  

भारतामध्ये आज पाच राज्यातील निवडणूकींचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोल (Exit Poll)  जाहीर केला जाणार आहे. उत्तर प्रदेश, उत्‍तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर विधानसभा निवडणूकीमध्ये कोणाच्या पारड्यात मतदारांनी आपला कौल दिला आहे याचा अंदाज जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार यांना निकालापूर्वी जाहीर होणार्‍या या एक्झिट पोलचं आकर्षण आहे.

उत्तराखंड मध्ये 70 विधानसभा जागांवर निवडणूक पार पडली आहे. यंदा निवडणूकीच्या रिंगणामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पूर्व मुख्यमंत्री हरीश रावत, सतपाल महाराज, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, धन सिंह रावत देखील होते. त्यामुळे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 14 फेब्रुवारीला एका टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये 61% मतदान पार पडले आहे. कोविड 19 नियमावलीचं भान ठेवत पार पडलेल्या या निवडणूकीमध्ये उत्तराखंडात मतदानाकरिता 11,697 केंद्र बनवली गेली होती.

उत्तराखंड मध्ये 70 विधानसभा जागांसाठी 632 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान निवडणूकीचा अंतिम निकाल 10 मार्च दिवशी जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात होणार आहे.