मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर अखेरीस शुक्रवारी एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांची कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस तर्फे यासंदर्भात माहिती देणारे एक पत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले होते, मात्र जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांनी या पत्रकावरून काँग्रेसला निशाणा केलं आहे. या पत्रकात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहमतीने गायकवाड यांची नियुक्ती करत असल्याचे म्हणण्यात आले होते, यावर उत्तर देताना ओमर यांनी नियुक्ती करणाऱे राष्ट्रीय अध्यक्ष नेमके आहेत तरी कोण असा सवाल केला आहे. मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करु नये, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावले
लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसच्या दारुण पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी आपल्याकाँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता,आणि त्यापाठोपाठ जणू काही काँगेसमध्ये राजीनाम्याचे सत्रच सुरु झाले होते. याच सत्रात मिलींद देवरा यांनीसुद्धा आपल्या पदाचा त्याग करत असल्याची घोषणा केली होती, ज्यावर काँग्रेसच्या अन्य नेतेमंडळींकडून मोठया प्रमाणात टीका सुद्धा झाली होती, यानंतर काल एकनाथ गायकवाड यांची अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र ही नियुक्ती कोणाच्या सहमतीने करण्यात आली आहे असा प्रश्न ओमर यांनी केला आहे. शिवाय काँग्रेसच्या राष्ट्राध्यक्ष पदी नेमके आहे कोण? की, अन्य कोणाची नियुक्ती होईपर्यंत राहुल गांधी हेच या पदावर कायम राहणार आहेत, असेही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.
ओमर अब्दुल्ला ट्विट
“Hon’ble Congress President has approved.........” but who is the Congress President? Does Rahul continue as caretaker until a full time president is found? https://t.co/WejXr8wikG
— Omar Abdullah (@OmarAbdullah) July 26, 2019
दरम्यान, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये म्हणून मध्यंतरी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र त्यानंतरही राहुल यांनी ठाम पणे राजीनामा दिला होता, तसेच आपल्यानंतर या पदासाठी गांधी घराण्याबाहेरील एखादे नाव पुढे येणार असल्याचे देखील म्हंटले हते, ज्यावरून प्रियंका वड्रॉ गांधी यांचे नाव सुद्धा चर्चेत होते, पण हा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करणे गरजेचे होते.