File image of Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीरसाठी (Jammu-Kashmir) स्वतंत्र पंतप्रधानाची भूमिका घेणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी कठुआ येथे जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीरच्या दोन कुटुंबांना भारताचे विभाजन करु देणार नाही असे पंतप्रधान मोदी यांनी सुनावले आहे. ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) आणि मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) या दोघांनी जम्मू-काश्मीरच्या तीन पिढया उद्धवस्त आहेत. त्यामुळे या दोघांना मी देशाचे विभाजन करु देणार नाही. ना मी कोणासमोर झुकत, ना कोणी मला विकत घेऊ शकतं असे मोदी यांनी सभेमध्ये वक्तव केले आहे.

मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला या दोघांनी मिळून जम्मू-काश्मिरच्या तीन पिढ्या उद्धवस्त केल्या आहेत. हे दोघे मोदी यांना नकोनको ते अपशब्द वापरु शकतात. परंतु भारताचे विभाजन करणे अशक्य असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

तसेच काँग्रेस पक्षाच्या धोरणामुळे काश्मिरी पंडितांना येथून निघून जावे लागले. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांना व्होट बँकेची इतकी चिंता होती की, त्यांनी काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष केले असे मोदी यांनी यावेळी म्हटले. काश्मिरी पंडितांना खोऱ्यामध्ये त्यांची भूमी परत मिळवून देण्यासाठी त्यांना वसवण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे मोदींनी सांगितले.