हेमा मालिनी, सनी देओल यांच्या विजयानंतर धमेंद्र आणि ईशा देओल यांचे शुभेच्छा देणारे खास ट्विट
Sunny Deol & Hema Malini (Photo Credits: File Photo)

यंदा देओल कुटुंबातील दोन ग्लॅमरस चेहरे लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Elections 2019) रिंगणात उतरले होते. हेमा मालिनी (Hema Malini) यांनी मथुरा (Mathura) तर सनी देओल (Sunny Deol) यांनी गुरुदासपूर (Gurudaspur) येथून निवडणूक लढवली होती आणि विशेष म्हणजे दोघेही विजयी झाले. हेमा मालिनी आणि सनी देओल या दोघांच्या विजयानंतर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी ट्विट करत या दोघांचेही अभिनंदन केले आहे.

धमेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, "हेमा अभिनंदन... आमचे भारत मातेवर प्रेम आहे... आपण हे बिकानेर आणि मथुरेत सिद्ध केले आहे. आपण नेहमीच असे उंच शिखर गाठत राहू..."

सनी देओल यांचे ट्विट:

तर सनी देओल यांच्या विजयावर प्रतिक्रीया देताना धमेंद्र यांनी लिहिले की, "फकीर बादशाह मोदी जी, भूमी पुत्र सनी देओल, अभिनंदन. अच्छे दिन आ गए."

त्याचबरोबर अभिनेत्री ईशा देओल हिने देखील आई आणि भावाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. ईशाने ट्विट करत लिहिले की, "अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, हेमा मालिनी आणि सनी देओल. तुमचा खूप अभिमान आहे. काय विजय मिळवलाय."

ईशा देओल हिचे ट्विट:

 

काल लागलेल्या लोकसभा निवडणूक निकालानंतर भारतात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे.