महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचं नाट्य अजूनही कायम आहे. कारण भाजपने अजित पवार यांची मदत घेत सरकार तर स्थापन केलं होतं परंतु हे सरकार फक्त 79 तासांत कोसळलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे बहुमताचा आकडा भाजपला सिद्ध न करता आल्यामुळे आणि अजित पवार यांनी आज राजीनामा दिल्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला अपयश आले. अखेर त्यांना 79 तासांत आपला राजीनामा द्यावा लागणार आहे, ज्यासाठी ते आता राज्यपालांना भेटायला जाणार आहेत.
पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की देवेंद्र फडणवीस 79 तासांच्या सरकार पेक्षाही कमी काळ दिकणारी सरकारं आपल्या देशात या आधी आली आहेत.
जगदंबिका पाल
आजवरच्या भारताच्या राजकारणातील इतिहासात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद हे जगदंबिका पाल यांच्या हाती होते. उत्तरप्रदेशात २१ फेब्रुवारी १९९८ रोजी राज्यपालांनी कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त केले आणि जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची परवानगी दिली. परंतु फ्लोर टेस्ट दरम्यान जगदंबिका यांना बहुमताचा आकडा सिद्ध न करता आल्याने एकाच दिवसाच्या कालावधीत त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
बी. एस. येडियुरप्पा
कर्नाटक राज्यात भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांना देखील मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली होते ती ही अडीच दिवसात. न्यायालयाने बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर बहुमत सिद्ध करायला सांगितले होते. परंतु ते तसं न करू शकल्यामुळे तिथेही भाजपचं सरकार अडीच दिवसात कोसळलं होतं.