Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मार्चला सकाळी 11 वाजता मन की बात मधून जनतेशी संवाद साधणार
File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून त्याचा आकडा 900 च्या पार गेला आहे. त्यामुळे येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असून नागरिकांना या काळात घरी बसण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले होते. त्यानंतर आता उद्या (29 मार्च) पंतप्रधान  नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) मधून जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती ट्वीटरवरुन देण्यात आली आहे.

भारतावर आलेले कोरोना व्हायरसच्या संकटासोबत लढण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाउनची गरज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. तसेच देशातील डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मात्र नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करणे हे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्याच्या मन की बात मध्ये नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस संबंधित अधिक बोलतील अशी अपेक्षा केली जात आहे.(देशात 21 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 46 वर्षीय महिला रुग्णाने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास)

कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच सरकारकडून सुद्धा विविध नियमांची अंमलबजावणी करत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच प्रयत्न केला जात आहे. तरीही कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 918 वर पोहचला आहे. तर 80 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 19 जणांचा आतापर्यंत देशात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे