काँग्रेस आमदार जयकुमार गोरे व भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीमागील उद्देश वेगळाच, गोरे यांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण
Congress MLA Jaykumar Gore meets Girish Mahajan (Photo Credits: Twitter)

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपा पक्षात प्रवेश घेणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सह अन्य नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा ऐकू येत होत्या त्यात अलीकडे काँग्रेसचे खासदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे देखील नाव  यामध्ये जोडले जात होते. माढा (Madha Constituency) मतदारसंघातील भाजपाचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर (Ranjitsingh Nimambalakar) यांच्या सोबत नुकतीच जयकुमार यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भेट घेतली यावरून या पक्षांतराच्या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. मात्र आता याला विराम लावत जयकुमार यांच्या कार्यलयाने या भेटीचा उदिष्ट वेगळा होता अशी माहिती दिली आहे.

ANI ट्विट 

जयकुमार हे काँग्रेस पक्षाचे माण-खटाव तालुक्याचे आमदार म्ह्णून कार्यरत असताना अनेकदा त्यांनी आपल्या पक्षाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे . इतकेच नव्हे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी रणजितसिंग यांना माढा मध्ये मोठा पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे गिरीश महाजन यांची एकाएकी घेतलेली भेट ही नेमकी कशासाठी यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, तसेच भाजपात प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र यामागील हेतू काही वेगळाच असल्याचे आता त्यांच्या कार्यलयातर्फे सांगण्यात येतेय.

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे अनेक पक्षातील नामवंत नेत्यांनी राजीनामे द्यायला सुरवात केली होती. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण रादहकृष्ण विखे पाटील यांचाही समावेश आहे. औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. मात्र पक्षानं त्यांना तिकीट दिलं नव्हतं. जूनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसेल, असा इशारा त्यांनी एका व्हिडीओतून दिला होता . तर मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते.

एकंदरीत या घटनांची पार्शवभूमी पाहिल्यास या बड्या नेत्यांना भाजपाकडे वळवण्यात गिरीश महाजन यांचा मोठा वाटा असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे अशा वेळी जयकुमार यांनी महाजन यांची घेतलेली भेट काँग्रेसला धक्का देण्याकरिता असल्याचे भासणे साहजिक होते. पण आता त्यांनी स्वतः दिलेल्या स्पष्टीकरणानंतर चर्चा काही काळ तरी थांबल्या आहेत.