Chandrakant Patil | (Photo Credit - Twitter)

भंडारा येथील प्रदेश काँग्रेस (Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर (MVA) चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे कि राज्याचे पोलिस (Maharashtra Police) दबावाखाली काम करत आहेत. पंतप्रधानांनवर (PM Narendra Modi) केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्य सरकारने लक्ष वेधले नाही. त्यामुळे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आता पटोले यांच्या वक्तव्यावर न्यायालयात दाद मागणार आहेत. दरम्यान ते पुढे म्हणतात, नारायण राणेंच्या (Narayan Rane) वक्तव्यावर कारवाई होते, पण नाना पटोले यांच्या वक्तव्यावर कारवाई होत नाही, असा सवाल ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणतात, जो न्याय राणेंना तो न्याय नाना पटोलेंना का नाही असा सवाल करत त्यांनी राज्यात 'हम करे सो कायदा' असं चित्र असल्याची टीकाही केली आहे. नाना पटोले म्हणाले- मोदींना मारा, नवाब मलिक म्हणाले- फडणवीसांना काशीचा घाट दाखवा. या सगळ्यातून राज्यात हम करे सो कायद्याचे चित्र समोर येत आहे. नाना पटोले हे किती खोट रेटत असले तरी ते तरी ते लपून राहणार नाही. आता कितीही नाटकं केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे पटोलेंवर त्वरित कारवाई झालीच पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. (हे ही वाचा Nana Patole Controversial Video: मी मोदींना मारु शकतो, पटोलेंच वादग्रस्त व्हिडिओ होतोय व्हायरल, भाजपाचा पटोलेंनवर हल्लाबोल)

काय होते नाना पटोलेचं वादग्रस्त विधान?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी भंडारा जिल्ह्यात आले होते. एका निवडणुकीच्या प्रचारसभेत नाना म्हणाले, "मी मोदींना मारू शकतो आणि त्यांना शिव्या देवु शकतो." असे वादग्रस्त विधान केले. या विधाना संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपने पटोले यांच्या विधानाचा जाहीर निषेध करुन त्यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली आहे.