Nana Patole Controversial Video: मी मोदींना मारु शकतो, पटोलेंच वादग्रस्त व्हिडिओ होतोय व्हायरल, भाजपाचा पटोलेंनवर हल्लाबोल
Nana Patole | (Photo Credits: twitter)

भंडारा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) रविवारी भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आले होते. एका निवडणुकीच्या प्रचारसभेत नाना म्हणाले, "मी मोदींना मारू शकतो आणि त्यांना शिव्या देवु शकतो." असे वादग्रस्त विधान केले. या विधाना संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भाजपने (BJP) पटोले यांच्या विधानाचा जाहीर विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही नानांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, नानांची शारीरिक उंचीबरोबरच बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी. तसेच, काँग्रेस पक्ष सत्तेसाठी एवढ्या टोकाला गेला आहे का? असा संतापजनक प्रश्नही विचारण्यात आला आहे.

Tweet

नाना पटोलेंचं डोक फिरलय का? - चंद्रकात पाटील

काँग्रेस पक्षानंच तालिबानी संघटनेशी युती केलीय - चित्रा वाघ

पटोले यांची राजकीय संस्कृती आणि संस्कार यातून दिसून येतात - बावनकुळे

नाना पटोले यांच विधानवर स्पष्टीकरण

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी सोशल मीडिया माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले की, "भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही.