BJP Delegation: भाजप आणि शिवसेना वाद आता दिल्लीपर्यत, सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत भाजपचे शिष्टमंडळ गृहसचिवांना भेटणार
Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

राज्यात भाजप आणि शिवसेना (BJP vs Shivsena) यांच्यातील होणार वाद आता दिल्लीपर्यत (Delhi) पोहचणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शनिवारी रात्री मुंबईत हल्ला झाला, त्यानंतर हे प्रकरण आज दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे एक शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचून केंद्रीय गृहसचिव अजय कुमार (Ajay Kumar) भल्ला यांची भेट घेणार आहे. किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचून मुंबईच्या रस्त्यावर घडलेल्या प्रकाराबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचीही भेट होण्याची शक्यता आहे.

 किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांना केले लक्ष्य

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना मोकळीक दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या करत आहेत. किरीट सोमय्या यांना मारण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे सरकारचे पोलिस गुंडगिरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. देव आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे मी आज जिवंत आहे. किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांना लक्ष्य करत आहे, तर मुंबई पोलीस त्याच्या वाहनावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमय्या यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली होती.

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला

भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमधून बाहेर येत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरच हल्ल्याचा आरोप होत आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना भेटण्यासाठी सोमय्या गेले होते, असे सांगण्यात येत आहे. (हे देखील वाचा: नवनीत राणा भायखळा, तर रवी राणा तळोजा तुरुंगात, देशद्रोहासह अनेक कलमांत गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमय्या खार पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत असताना अनेक लोक मोबाईल आणि कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवत होते. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलीस या सर्व व्हिडिओंचा तपास करत आहेत. जेणेकरून किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटू शकेल.