Tirath Singh Rawat बनणार Uttarakhand चे नवे मुख्यमंत्री; Trivendra Singh Rawat यांची माहिती
Tirath Singh Rawat । Photo Credits: Twitter

उत्तराखंड मध्ये काल (9 मार्च) राजकीय घडामोडी वेगवान घडत होत्या त्यामध्येच त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला. त्यानंतर आज उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी भाजपाच्या तीरथ सिंह रावत यांची वर्णी लागली आहे. त्रिवेंद्र सिंग रावत यांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान त्रिवेंद्र यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार अनिल बलूनी, कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक, महाराष्ट्र, गोवाचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. पण अखेर Tirath Singh Rawat यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 50 वर्षीय तीरथ सिंह रावत हे  गढ़वाल चे आमदार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.  Uttarakhand: मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी दिला पदाचा राजीनामा; जाणून घ्या कोण होऊ शकते उत्तराखंडचे नवे Chief Minister.

ANI Tweet

त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरूद्ध भाजपामधूनच आमदारांची नाराजी होती. आमदारांची नाराजी लक्षात घेता भाजपा पक्षाचे उत्तराखंड प्रभारी दुष्यंत गौतम आणि केंद्रीय पर्यवेक्षक रमण सिंह यांना देहरादून येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी नाराज असलेल्या आमदारांशी बैठक घेतली आणि त्यांचा आक्षेप ऐकला पण आमदारांचे मन राखण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सीएम त्रिवेंद्र स्वत: दिल्ली येथे गेले आणि त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा दिला आहे.

दरम्यान उत्तराखंड विधानसभेमध्ये संख्याबळ हे एकूण आमदार 70 आहे. त्यामध्ये भाजपाकडे 56 आमदार आहेत तर कॉंग्रेसचे 11 आणि दोन आमदार अपक्ष आहेत. एक जागा अद्याप रिक्त आहे.