Asaduddin Owaisi | (Photo Credits: Facebook)

Asaduddin Owaisi On BJP: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शनिवारी महाराष्ट्रातील भिवंडीत एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी ओवेसी म्हणाले, "भाजप नेते ताजमहलच्या खाली पंतप्रधानांची पदवी शोधत आहेत."

काही आठवड्यांपूर्वी उफाळलेल्या ताजमहल वादाच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे. आग्रा येथील ताजमहालमधील 22 बंद खोल्यांमागील सत्य शोधण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने याचिका दाखल केली होती. प्रत्यक्षात येथे जुने शिवमंदिर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 12 मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि सांगितले की, अशा गोष्टी इतिहासकारांवर सोडल्या पाहिजेत. (हेही वाचा - Asaduddin Owaisi Statement: निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत लग्न केले, आता त्यांच्यात वधू कोण आहे हे मला माहीत नाही, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य)

भारत द्रविड आणि आदिवासींचा देश -

त्याच भाषणात ओवेसी म्हणाले की, 'मुघल भारताबाहेरून कसे आले याबद्दल भाजप बोलत असते. परंतु, जगाच्या विविध भागांतून इतर अनेक समुदायांचे लोकही भारतातून आले. फक्त द्रविड आणि आदिवासी भारतातील आहेत. भारत ना माझा आहे, ना ठाकरे, ना मोदी-शाहांचा. भारत कोणाचा असेल तर तो द्रविड आणि आदिवासींचा आहे. भाजप-आरएसएस मुघलांच्या नंतर आहे.'

ओवेसी यांनी शिवसेनेच्या युतीत सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विधानसभा निवडणुकीत ओवेसींना मतदान करण्यास सांगत होते. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेशी लग्न केले. तीन पक्षांपैकी कोणती वधू आहे हे मला माहीत नाही, अशी खोचक टीकाही ओवेसी यांनी यावेळी केली.