संदीप सिंह, बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त (Photo Credits: Getty Images/ IANS)

दंगलीत हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीत जगातील सर्वात मोठे कुस्तीपटू घेणाऱ्या योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt) आणि बबिता फोगाट (Babita Phogat) यांचा पराभव झाला आहे. तर, माजी ऑलिम्पियन आणि सुप्रसिद्ध ड्रॅग फ्लिकर संदीप सिंह (Sandeep Singh) निवडणुकीत गोल करण्यात यशस्वी ठरले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर हे तिन्ही खेळाडू भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झेले होते. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंह कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा सीटवरुन मैदानात उतरला होता, आणि येथून त्याने विजय संपादन केले. संदीपने जवळचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे मनदीपसिंग चट्टा याला 5,314 मतांच्या फरकाने पराभूत केले. संदीपला 42, 613 मतं मिळाली तर चट्टाला 37,299 मते मिळाली. (Maharashtra Assembly Election Result 2019: महायुतीला मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत राज्यसभेतील 6 मंत्र्यांचा दारूण पराभव)

दुसरीकडे, बडोद विधानसभा मतदार संघातून भाजपच्या ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारा योगेश्वर दत्त याला पराभव पत्करावा लागला आहे. कॉंग्रेसच्या श्रीकृष्णा हुडाविरूद्ध योगेश्वरने पहिले आघाडी मिळाली होती, पण जसे जशी मतांची संख्या वाढली तो मागे पडत राहिला. योगेश्वरला 16, 729 मतं मिळाली आणि तो तिसऱ्या स्थानावर राहिला. हुड्डाला 50,530 मतं मिळाली तर त्याच्या जवळच्या उमेदवार आयएनएलडीचे उमेदवार कपूर सिंह नरवाल यांना 34,3477 मते मिळाली.

दोनदा कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेती बबिता फोगाट यांना दादरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात भाजपने मैदानात उतरवले होते. पण अनपेक्षितपणे तिचा अपक्ष उमेदवार सोंबीर यांनी पराभव केला. बबीतासुद्धा योगेश्वरसारख्या तिसऱ्या स्थानावर राहिली. सोमबीरला 43, 849 मते मिळाली. आणि दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या सतपाल सांगवान यांना 29, 577 मते मिळाली. बबिताला 24,786 मतं मिळविण्यात यश आले.