Bihar Assembly Elections 2020 Phase 1 Begins (Photo Credits: ANI)

बिहार विधानसभा निवडणूकींच्या (Bihar Assembly Elections) मतदानाचा आज पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात आज 71 विधानसभा जागांसाठी सुमारे 1066 उमेदवारांसाठी हे मतदान होत आहे. कोविड 10 च्या सावटामध्ये भारतामध्ये बिहार हे पहिलेच राज्य आहे जेथे मतदान होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याच पार्श्वभूमीवर ट्विटर द्वारा मतदारांना सुरक्षेचे काळजी घेत आपलं मत नोंदवण्यासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केले आहे. Bihar Assembly Election 2020: 'भाजपा'चे जवळचे आमने-सामने; बिहार विधानसभा निवडणुकीत NDA समोर नवी आव्हाने?

बिहार मध्ये 71 जागांसाठी आज सुमारे 2 कोटी 14 लाख नागरिक आपलं मत नोंदवू शकतात. त्यासाठी 31,380 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. हे मतदान कोविड 19 संकटात सुरक्षित व्हावं यासाठी वेळोवेळी खबरदारी घेतली जात आहे. सॅनिटायझेशनचेही काम सुरू आहे.

ANI Tweet

पहिल्या टप्प्यामध्ये एनडीए आणि भाजपाचे 29, जेडीयू चे 35, हिंदुस्तानी आवाम मोर्चा चे 6, विकासशील इंसान पार्टी चा 1 उमेदवार निवडणूकींच्या रिंगणात आहे. तर महागठबंधन मध्ये जेडीयू 42, कॉंग्रेस 21, भाकपा (माले) 8 उमेदवार मैदानात आहेत. बिहारच्या 243 जागांसाठी 3 टप्प्यांत मतदान होईल. आता दुसरा ट्प्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसर्‍या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला असेल. 10 नोव्हेंबरला मतमोजणी आहे.