Bihar Assembly Elections 2020 ABP C Voter Exit Polls Result: एबीपीच्या बिहार निवडणूक एक्झिट पोल निकालानुसार NDA - UPA मध्ये कांटे की टक्कर; पहा कुणाला किती जागा मिळणार?
Bihar Assembly Elections 2020 | (Photo Credits: File Image)

Exit Polls Results Of ABP News-C Voters For Bihar Elections: बिहार (Bihar) मध्ये आज तिसर्‍या टप्प्यातील आणि अंतिम मतदानाच्या दिवसानंतर एक्झिट पोल (Exit Polls) निकाल हाती आले आहेत. यामध्ये एबीपी न्यूज(Abp News) आणि सी व्होटरच्या (C Voters) एक्झिट पोल निकालानुसार एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार एनडीएला 104-128 जागांवर विजय मिळू शकेल. तर युपीएलला 108-131 जागा मिळू शकतात. चिराग पासवान कडे 1-3 जागा मिळू शक्तात तर अन्य 4-8 जागांवर विजय मिळवू शकणार आहेत. आता अंतिम फैसला हा 10 नोव्हेंबर दिवशी समोर येणार आहे. Bihar Assembly Election 2020 Exit Polls Results: बिहार निवडणूकीचे ABP न्यूज एक्झिट पोल निकाल इथे पहा लाईव्ह.

बिहार मध्ये एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सत्तांतर होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच नीतीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुरूवातीपासून तेजस्वी यादव यांच्याकडे मतदार आकर्षित झाले होते. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर बिहारमध्ये बेरोजगारीचा मुद्दा आता अधिक कळीचा झाला होता.

ABP News - सी व्होटर्सच्या अंदाज काय?

एनडीए मध्ये कोणाला किती मतं?

एनडीए (104-128)

जेडीयू - 38-46

भाजपा -66-74

व्हीआयपी -0

हम-0

यूपीए (108-131)

आरजेडी 81-89

कॉंग्रेस 21-19

डावे पक्ष - 6-13

बिहारच्या विधानसभेमध्ये एकूण 243 जागा आहेत. सत्तास्थापनेसाठी 122 जागा असणं आवश्यक आहे. बिहारने यंदा नेमकं कुणाच्या पारड्यात सत्तेच्या चाव्या टाकणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. अगदी कांटे की टक्कर आहे. दरम्यान यंदा लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय पहिल्यांदाच आरजेडी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.