Assembly Elections Results 2018: मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुक मतमोजणी निकाल भाजपसाठी अत्यंत धक्कादायक आहेत. तर, हेच निकाल गेली चार, साडेचार वर्षे सातत्याने पराभवाची मालिका रचणाऱ्या काँग्रेससाठी दिलासादायकच नव्हे तर, थेट उर्जितावस्था देणारे ठरु पाहात आहेत. या पाचही राज्यांमध्ये भाजप पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक सुरु असलेल्या राज्यांसह देशभरातील काँग्रेस कार्यालयांमध्ये जोरदार जल्लोष सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आजवर संपूर्ण निकाल हाती येण्याआगोदरच जल्लोषासासाठी चोख बंदोबस्त करुन ठेवणाऱ्या भाजपच्या गोटात मात्र जबरदस्त सन्नाटा पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीने ओसंडून वाहणारी भाजप कार्यालयं निकालाच्या पार्श्वभूमीवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
पूर्ण बहूमतात असलेले राजस्थान भाजपच्या हातातून पूर्णपणे निसटल्याचे चित्र आहे. तर, मध्य प्रदेश निसटण्याच्या मार्गावर आहे असे दिसते. भाजपची सत्ता असलेल्या या दोन्ही प्रमुख राज्यांमध्ये भाजपचा थेट पराभव होताना दिसतो आहे. वसुंधरा राजे मुख्यमंत्री असलेल्या राजस्थानमध्ये 199 जागांपैकी काँग्रेस तब्बल 103 जागांवर आगाडी घेत आहे. तर, भाजप 69 जागांवरच अडकला आहे. तर 27 उमेदवार इतर ठिकाणी आगाडीवर आहेत.
दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश हे तर जणू भाजपचे हक्काचे राज्य पण इथेही काँग्रेसने भाजपच्या नाकात दम आणल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस 113 जागांवर आघाडी घेताना दिसतो आहे. तर, भाजप 105 जागांवरच रेंगाळताना पाहायला मिळत आहे. 10 ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार आगाडीवर आहेत. (हेही वाचा, काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर तरीही भाजपशी काट्याची टक्कर कायम)
छत्तीसगडमध्ये उण्यापुऱ्या 99 जागांपैकी काँग्रेसने 68 जागांवर आघाडी घेत आहे. तर, भाजप 13 जागांवर आहे. 9 उमेदवार इतर जागांवर आगाडीवर आहेत. तेलंगणातील निकालाचे चित्र पाहता टीआरएस 86 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 23, भाजप केवळ 1 तर इतर 5.