पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी मोदी यांनी खातेवाटप केले. तर भाजप (BJP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांना आता देशाच्या गृहमंत्रिपदाचा (Home Minister) पदभार स्विकारण्यास दिला आहे.यापूर्वी राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा पदभार सोपवण्यात आला होता.
अमित शहा यांना गृहमंत्री पदभार देण्यात आला असून त्यांचा समावेश कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये होणार आहे. यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ही मंडळी एकत्र काम करणार आहेत.(Modi Cabinet Full List of Ministers: पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; ज्येष्ठांची खांदेपालट, नव्या चेहऱ्यांवर मोठी जबाबदारी; एका क्लिकवर जाणून घ्या कोणाकडे कोणते खाते?)
Delhi: Amit Shah takes charge as the Union Home Minister. MoS (Ministry of Home Affairs) G Kishan Reddy and Nityanand Rai are also present. pic.twitter.com/FaxGYpuiT0
— ANI (@ANI) June 1, 2019
तर भाजप प्रणित एनडीए मंत्रिमंडळातील निवडक खासदार देशभरातून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्याचसोबत निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman ) अर्थमंत्री तर राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना संरक्षण मंत्रिपद देण्या आले आहे. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग मंत्रालय कायम ठेवण्यात आले असून, या मंत्रालयाचा कारभार आता खा. अरविंद सावंत सांभाळणार आहेत.