File image of Rajnath Singh, Amit Shah, Narendra Modi | (Photo Credits: PTI)

Modi Cabinet Full List of Ministers: नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर भाजप प्रणित NDA सरकार मूर्त स्वरुपात सत्तेवर आले. गुरुवार (30 मे 2019) रोजी मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या खासदारांचा शपथविधीही संपन्न झाला. आता तर शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटपही पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्या त्या मंत्र्यांना आपापल्या कार्यालयाचा कारभार सांभाळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात अमित शहा (Amit Shah) गृहमंत्री, निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman ) अर्थमंत्री तर राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना संरक्षण मंत्रिपद देण्या आले आहे. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग मंत्रालय कायम ठेवण्यात आले असून, या मंत्रालयाचा कारभार आता खा. अरविंद सावंत सांभाळणार आहेत. दरम्यान, मोदी मंत्रिमंडळातील खातेवाटप आणि मंत्र्यांवरील जबाबदारी जाणून घ्या एका क्लिकवर.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ संपूर्ण यादी इथे पाहा

मंत्र्याचे नाव खातंमंमंत्रिपदाचा दर्जा खाते राज्यराज्य
नरेंद्र मोदी पंतप्रधान पंतप्रधान (इतर मंत्र्यांकडे नसलेली सर्व खाती) उत्तर प्रदेश
नितीन गडकरी कॅबिनेट मंत्री रस्ते आणि वाहतूक महाराष्ट्र
अमित शहा कॅबिनेट मंत्री गृहमंत्री गुजरात
पीयूष गोयल कॅबिनेट मंत्री  रेल्वे, वाणिज्य महाराष्ट्र
राजनाथ सिंह कॅबिनेट मंत्री संरक्षण उत्तर प्रदेश
प्रकाश जावडेकर कॅबिनेट मंत्री  माहिती प्रसारण, पर्यावरण महाराष्ट्र
स्मृती इराणी कॅबिनेट मंत्री महिला, बालकल्याण मंत्री उत्तर प्रदेश
डॉ. हर्षवर्धन कॅबिनेट मंत्री आरोग्य व विज्ञान दिल्ली
निर्मला सीतारामन कॅबिनेट मंत्री अर्थमंत्री तामिळनाडू
सदानंद गौडा कॅबिनेट मंत्री  रसायन कर्नाटक
नरेंद्रसिंग तोमर कॅबिनेट मंत्री  संसदीय कार्यमंत्री, कृषी मध्य प्रदेश
रमेश पोखरियाल निशंक कॅबिनेट मंत्री उत्तराखंड
अर्जुन मुंडा कॅबिनेट मंत्री झारखंड
धर्मेंद्र प्रधान कॅबिनेट मंत्री  पेट्रोलियम मंत्री ओडिशा
मुख्तार अब्बास नकवी कॅबिनेट मंत्री  सामाजिक न्याय उत्तर प्रदेश
फग्गनसिंह कुलस्ते राज्यमंत्री मध्य प्रदेश
महेंद्रनाथ पांडेय उत्तर प्रदेश
गजेंद्र सिंग शेखावत राजस्थान
संतोष गंगवार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
राव इंद्रजीत सिंह राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरियाणा
नित्यानंद राय राज्यमंत्री बिहार
श्रीपाद नाईक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गोवा
जितेंद्र सिंह राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जम्मू काश्मीर
प्रल्हाद पटेल राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मध्य प्रदेश
अर्जुन राम मेघवाल राज्यमंत्री राजस्थान
जनरल व्ही.के.सिंह राज्यमंत्री उत्तर प्रदेश
कृष्णपाल गुर्जर राज्यमंत्री हरियाणा
रावसाहेब दानवे राज्यमंत्री ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र
जी.कृष्ण रेड्डी राज्यमंत्री तेलंगणा
पुरुषोत्तम रुपाला राज्यमंत्री गुजरात
आर.के.सिंह राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  परराष्ट्र बिहार
मनसुख मांडविया राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गुजरात
थावरचंद सिंग गेहलोत  सामाजिक न्याय मध्य प्रदेश
बाबुल सुप्रियो राज्यमंत्री  पर्यावरण बंगाल
संजीव बालियान राज्यमंत्री उत्तर प्रदेश
संजय धोत्रे राज्यमंत्री मानव संसाधन विभाग महाराष्ट्र
अनुराग ठाकूर राज्यमंत्री हिमाचल प्रदेश
सुरेश अंगडी राज्यमंत्री कर्नाटक
रत्तन लाल कटारिया राज्यमंत्री हरियाणा
व्ही.मुरलीधरन राज्यमंत्री केरळ
रेणुका सिंग सरुता राज्यमंत्री छत्तीसगढ
सोम प्रकाश राज्यमंत्री पंजाब
रामेश्वर तेली राज्यमंत्री आसाम
कैलाश चौधरी राज्यमंत्री राजस्थान
देबोश्री चौधरी राज्यमंत्री पश्चिम बंगाल
रविशंकर प्रसाद  केंद्रीय कायदे बिहार
रामविलास पासवान  कॅबिनेट मंत्री  अन्न आणि वितरण बिहार
हरसिमरत कौर बादल  अन्न प्रक्रिया पंजाब
अरविंद सावंत कॅबिनेट मंत्री अवजड उद्योग महाराष्ट्र
रामदास आठवले राज्यमंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र
साध्वी निरंजन ज्योती राज्यमंत्री मध्य प्रदेश
किरन रिजिजू राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अरुणाचल प्रदेश
गिरीराज सिंह बिहार
एस. जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय माजी परराष्ट्र सचिव
हरदीप सिंग पुरी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
प्रल्हाद जोशी  संसंदीय कामकाज कर्नाटक
प्रताप सारंगी राज्यमंत्री ओडिशा
अश्वनी चौबे राज्यमंत्री बिहार

सतराव्या लोकसभेसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भाजप प्रणित एनडीए मंत्रिमंडळातील निवडक खासदार देशभरातून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी महाराष्ट्राच्या वाट्याला या वेळी किती मंत्रिपदं येणार? कोणकोणत्या खासदारांना मंत्रेपदाची संधी मिळते याबाबत उत्सुकता होती. सुरुवातीला मंत्रिपदाच्या चर्चेत शिवसेनेचे अरविंद सावंत, भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दाणवे, संजय धोत्रे या मंडळींची नावं आघाडीवर होती. अपेक्षेप्रमाणे या नावांना संधी मिळाली