पंतप्रधान मोदी यांच्या प्रमाणे आपलेही पती आपल्याला सोडून जातील अशी भाजपा महिला कार्यकर्त्यांना भीती! - मायावती
File images of PM Modi, Mayawati | (Photo Credits: PTI)

अलवार सामूहिक बलात्कार (Alwar Gang rape Case)  प्रकरणानंतर बहुजन समाजवादी पार्टीच्या (Bahujan Samajvadi Party)  सर्वेसर्वा मायावती (Mayavati)  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे सत्र कायम असल्याचे

पाहायला मिळत आहे. राजस्थान (Rajasthan) मधील अलवार मध्ये एक दलित महिलेवर बलात्कार झाल्यानंतर दुःख व्यक्त करणाऱ्या मायावतीं मगरीचे अश्रू ढाळत आहेत अशी टीका मोदींनी एका प्रचारसभेत केली होती, यावर स्वतःच्याच पत्नीला सोडून आलेले मोदी दुसऱ्यांच्या पत्नीचा किंवा बहिणीचा काय मान ठेवणार, असे म्हणत मायावतींनी पलटवार केला आहे.

"नरेंद्र मोदी सर्वच घटनांचे राजकारण करू पाहतायत ही लज्जास्पद बाब आहे सुरवातीला या बलात्काराच्या घटनेवर मोदींनी मौन पाळले आणि आता त्याचाच वापर मत मिळवण्यासाठी करतायत", असे मत मायावतींनी माध्यमांसमोर समोर मांडले.

ANI ट्विट

ANI ने ट्विट मार्फत दिलेल्या माहितीनुसार, भाजपमधील विवाहित महिला या आपल्या पतीवर वाईट परिणाम होऊ नये म्ह्णून त्यांना मोदींपासून लांब ठेवतात, स्वतःच्या पत्नीला सोडून आलेला माणूस आम्हालाही पतीपासून वेगळं करेल अशी भीती त्यांना वाटते असे देखील मायावती सांगत होत्या. व्हिडिओ: मायावती केस रंगवतात, फेशिअल करतात; मोदी मात्र स्वच्छ कपडे वापरतात: भाजप आमदार

ANI ट्विट  

अलवार मध्ये 26 एप्रिल ला एका दलित तरुणीवर पतीच्या समोरच काही अज्ञातांनी बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती, या घटनेचा निषेध करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व बसपा च्या मायावती यांनी राजस्थान सरकारवर टीका केली होती मात्र नरेंद्र मोदींनी हा निषेध केवळ नाटकी आहे असे म्हणत,जर तुम्हाला खरंच या घटनेने वाईट वाटत असेल तर राजस्थानातील काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा काढून का घेत नाही असा प्रश्न कुशीनगर येथील सभेत बोलताना केला होता. Rajasthan Alwar Gangrape: नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पोलिसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप

 

दरम्यान या घटनेची तक्रार नोंदवून घेत यातील आरोपी व संशयीना पकडण्यासाठी पोलिसांची एक खास तुकडी तयार करण्यात आली आहे. यातील तीन संशयी सध्या पोलिसांच्या ताब्यात आले असून इतरांनाच तपास सुरु आहे. यातील कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा झाल्याखेरीज सोडण्यात येणार नाही अशी खात्री मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली आहे.