Lok Sabha Elections 2019: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आगरा (Agra) येथील सीजेएम न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामा (Congress Manifesto ) 2019 मध्ये देशद्रोहाचे कलम हटविण्याबाबत आश्वासन दिले आहे. या आश्वासनाविरोधातच राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. नरेंद्र शर्मा (Narendra Sharma) नामक एका वकिलाने ही तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे की, 2019 लोकसभा निवडणुकीनंतर जर आपले सरकार आले तर, देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबत असलेले कलम-124 (अ) हटविण्यात येईल. काँग्रेसच्या याच आश्वासनावर वकील नरेंद्र शर्मा यांना आक्षेप आहे. काँग्रेसच्या या आश्वासनामुळे देशविरोधी कारवाया करणाऱ्या शक्तिला बळ मिळेल. असे होणे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे शर्मा यांचे मत आहे.
काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताच त्यावर भाजपने टीकेची झोड उठवली. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे खोटारडेपणा आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत असतानाही काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत अशी भाजपने टीका केली आहे. देशद्रोहाचे कलम जर हटवले तर देशाच्या अखंडतेला धोका पोहोचेन असा घणाघात भाजपने केला आहे. (हेही वाचा, मध्य प्रदेशमध्ये खळबळ; आयकर विभागाचा मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या घरावर छापा, 9 कोटी जप्त)
एएनआय ट्विट
#Agra: A case has been filed by lawyer Narendra Sharma in CJM Court against Congress President Rahul Gandhi for promising in Congress manifesto to abolish Section 124A (Sedition) of the Indian Penal Code. (06.04) pic.twitter.com/1SqMzt1VWT
— ANI UP (@ANINewsUP) April 7, 2019
काँग्रेस अध्यक्ष अमित शाह यांनीही काँग्रेस निवडणूक जाहीरनामा आपल्या टीकेचे लक्ष्य बनवला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा पाहून फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांना बळ मिळेल असे अमित शाह यांनी म्हटले आहे. काँग्रेसने जाहीर केलेला निवडणूक जाहीरनामा पाहता हा जाहीरनामा काँग्रेस नव्हे तर, जैश-ए-मोहम्मद या संघटनेने तयार केल्यासारखा वाटतो असेही शाह यांनी म्हटले आहे.