नथुराम गोडसे यांना हिंदू दहशतवादी म्हटल्यानंतर कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी
File image of MNM Chief Kamal Haasan | (Photo Credits: ANI)

"नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी" असल्याचे वादग्रस्त विधान अभिनेते आणि नेते कमल हासन (Kamal Haasan) यांनी लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) च्या प्रचारादरम्यान केले. कलम हासन यांच्या या व्यक्तव्यानंतर जोरदार वाद उफाळून येणार अशी शक्यता असताना आता त्यांना अलिख भारतीय हिंदू महासभेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. (नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी: कमल हासन)

चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हसन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना हे विधान केले होते. या विधानाचा भाजप-शिवसेनेकडून कडाडून निषेध केला जात आहे.

येत्या रविवारी अर्वाकुरची पोटनिवडणूक पार पडणार असून त्याच्या प्रचारादरम्यान कलम हासन यांनी केलेल्या या वक्तव्यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे लेखक, गीतकार विशाल भारद्वाज यांनी देखील सोशल मीडियावर नथुराम गोडसे यांचा भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या त्या पोस्टनंतर सोशल मीडियातही विविध चर्चांना उधाण आले होते.