Aditya Thackeray on CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जर आमच्यावर राग असेल तर तो राग त्यांनी मुंबईवर काढू नये : आदित्य ठाकरे
Aditya Thackeray | (Photo Credits-Facebook)

मुंबईतील (Mumbai) मेट्रो कारशेडच्या (Metro Car shed)  स्थलांतराचा निर्णय बदलून कारशेड आरेतच ( R A Forest) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचीत शिंदे (CM Eknath Shinde) सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे. आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. पर्यावरणवाद्यांनी  हे आंदोलन शांततापूर्ण पध्दतीने केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) परिसरात  बंदोबस्त तैनात होता. आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवादी संघटनांच्या या आंदोलनाला माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya) हजेरी लावली होती.

 

आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात आंदोलनात सहभागी होत आदित्य ठाकरे म्हणाले, आरेची लढाई ही  जंगल सुरक्षेची लढाई म्हणजे देशाची लढाई आहे. ही लढाई प्रत्येक मुंबईकराच्या हितासाठीची लढाई आहे. राज्यात ठाकरे सरकार असताना 808 एकर (Acres) जंगलक्षेत्र घोषित करत कारशेड कांजूरमार्गला (Kanjurmarg) स्थलांतरीत करण्यचा निर्णय घेण्यात आला होता. कारशेड कांजूरमार्गला बनवल्यास जंगल आणि पैसे या दोन्ही गोष्टी वाचवता येईल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जर आमच्यावर राग असेल तर तो राग त्यांनी मुंबईवर काढू नये, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. (हे ही वाचा:-शिंदे गटाच्या आमदारांचा दावा, उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणार नाही, भाजपने दिले होते आश्वासन)

 

शिवसेना (ShivSena) आमदार आदित्य ठाकरेंनी आरेबाबतच्या निर्णयावर सरकारला पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात उतरले आहेत. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली होती. म्हणजेच राजकीय मतभेद असले तरी आरे वाचवण्यासाठी ठाकरे पुत्र पुढे आले आहेत. यावरुन आरे संरक्षणाचा हा वाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.