शिंदे गटाच्या आमदारांचा दावा, उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणार नाही, भाजपने दिले होते आश्वासन
Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीदरम्यान भारतीय जनता पक्षाने (BJP) शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य न करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या प्रवक्त्याने शनिवारी केला. "महाराष्ट्रातील मागील ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांना याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले," असे बंडखोर शिवसेनेच्या गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकारांना सांगितले. केसरकर आणि इतर काही बंडखोर आमदारांनी याआधी सोमय्या यांचे ठाकरे यांच्यावर हल्ले सुरू ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. "आम्ही गुवाहाटीहून परत आलो आणि भाजप नेत्यांची बैठक घेतली, तेव्हा ठाकरें यांच्यावर कुठलीही टीका करु नये असे सांगितले होते.

'फडणवीसही उद्धवजींचा आदर करतात'

केसरकर म्हणाले की, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी याला सहमती दर्शवली आणि सोमय्या यांनी ठाकरेंवर हल्लाबोल सुरूच ठेवला तेव्हा फडणवीस त्यांच्याशी बोलले. "सोमय्या यांनी आज मला फोन केला आणि सांगितले की आमच्यात आणि फडणवीस यांच्यात झालेल्या कराराची त्यांना माहिती नाही," ते म्हणाले. (हे देखील वाचा: Sanjay Raut on Shiv Sena Rebel MLAs: शिवसेना हायकमांड मुंबईत मातोश्रीवर, एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत- संजय राऊत)

ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना शिवसेनेचे सर्व नेते, आमदार आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. भाजप आपल्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप करत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गप्प आहेत, असा आरोप ठाकरे यांनी शुक्रवारी केला होता. केसरकर म्हणाले, आमच्याप्रमाणे फडणवीसही उद्धवजींचा आदर करतात.