शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Rau) यांनी शिवसेना बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर राऊत यांनी आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना हायकमांड मुबईत मातोश्रीवर आहे. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांचे दिल्लीला. त्यामुळेच ते दिल्लीला गेले आहेत. ते सांगतात मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे म्हणून परंतू, वास्तवात ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. जे आज शिवसेनेतून फुटून गेले आहेत त्यांचे पुढे राजकीय आयुष्यात काहीही होणार नाही. या आधी अशी अनेकांनी बंडं केली आहेत. बंड करणारे आणि त्यांच्यासोब जाणारे संपले. शिवसेना मात्र जशी आहे तशीच आहे. नाशिक येथील शिवसेना मेळाव्यात राऊत बोलत होते. या वेळी त्यांनी आमदार गुलाबराव पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. गुलाबरावांचा जुलाबराव होईल. 50 खोके पचणार नाहीत, असा थेट हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत आपल्या आक्रमक शैलीत म्हणाले, आज जे शिवसेनेतून गेले आहेत ते केवळ उगेच गेले नाहीत. काही लोक 50 खोक्यांच्या अमिशाला बळी पडून गेले आहेत. काही ईडी, सीबीआयला घाबरुन गेले आहेत. इथे केवळ प्रश्न केवळ बऱ्या वाईटाचा नाही. खरा प्रश्न ईमान आणि बेईमानीचा आहे. ज्यांनी ईमान विकली त्यांनी शिवसेनेचे नाव लावू नये. आमचे त्यांना सांगणे आहे गेलात खुशाल जा. जिथे गेलात तिथे आनंदाने राहा. उगाच आम्ही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेनेला मानतो. उद्धव ठाकरे यांना मानतो असे सांगत फिरू नका. शिवसेनेत नेते येतात जातात. पक्ष संपत नाही. पक्ष आहे तिथेच राहतो. आजवर छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले. त्यांच्यासोबत गेलेल्या एकालाही पुढे निवडून येता आले नाही, अशी आठवणही संजय राऊत यांनी करुन दिली. (हेही वाचा, Arrest Warrant Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी)
ईडीच्या नोटीसांचे काय सांगता. आम्हालाही त्या आल्या आहेत. मला स्वत:ला ईडीची नोटीस आली आहे. माझ्या मुलींना ईडीचे नोटीस आले आहे. त्रास दिला जातो. कारणाशिवाय दिला जातो. पण आम्ही मागे हटणार नाही. 'मरण पत्करेन पण शरण जाणार नाही', असे संजय राऊत यांनी ठासून सांगितले. आज जे गेलेत त्यांना भविष्यात पश्चाताप करावा लागेल. शिवसेनेतून गेलेले हे लोक आज दररोज नवे कारण सांगत आहेत. पहिल्या दिवशी त्यांचे हिंदुत्त्व धोक्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना निधी मिळत नव्हता. तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे भेट देत नव्हते. चौथ्या दिवशी आदित्य ठाकरे त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत होते. पाचव्या दिवशी सांगतात संजय राऊत यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलो. माझे त्यांना आजही सांगणे आहे सर्वांनी एकत्र बसा आणि नेमके ठरवा आपण नेमके का बाहेर पडलो, असेही संजय राऊत म्हणाले.