आजचा दिवस धामधुमीचा, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल
Chandrakant Patil, Dhananjay Munde, Aditya Thackeray, Rohit Pawar | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूक रणधुमाळी आता अधिक रोमहर्षी बनत चालली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला आता काही तासांचाच अवधी शिल्लख राहिला आहे. त्यामुळे राज्यभरातील दिग्गज नते आणि उमेदवारांसाठी आजचा दिवस मोठा धामधुमीचा ठरतो आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वरळी येथून, भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कोथरुड तर राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, या प्रमुख नेत्यांशिवाय इतरही अनेक दिग्गज मंडळी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. काही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेसुद्धा.

अजित पवार यांचा बीड दौरा रद्द

परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगत आहे. बहिण-भावात होत असलेल्या या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे स्वत: दाखल होणार होते. मात्र, अजित पवार यांचा बीड दरा अचानक रद्द झाला. मुंबईत एका महत्त्वपूर्ण बैठक असल्यामुळे अजित पवार बिडसाठी येऊ शकले नाहीत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातल्या चारही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी अजित पवार बीडला जाणार होते. धनंजय मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोथरुड येथून चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला कोथरुडमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोध आहे. परंतू, तहीही चंद्रकांत पाटील हे येथून निवडणूक लढवत आहेत. आपल्याला होत असलेल्या विरोधाला त्यांनी पेल्यातील वादळ असे म्हटले आहे. आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (हेही वाचा, आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, मनसेकडून विरोधात उमेदवार नाही, उद्धव ठाकरे यांनी दिली बोलकी प्रतिक्रिया)

रोहीत पवार - जामखेड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार हे जामखेड येथून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. भाजप नेते आणि जलसंवर्धनमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार उमेदवारी करत आहे. राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने तगडा उमेदवार दिल्याने इथे जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील रिंगणात

सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीनिवास पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.