जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांना 'हिजबुल मुजाहिद्दीन' (Hizbul Mujahideen) या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला पकडण्यात यश आलं आहे. भारतीय जवानांकडून जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शोधमोहिम सुरू होती. या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून या दहशतवाद्याकडील मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. जुनैद फारुक, (Junaid Farooq) असं या दहशतवाद्याचं नाव आहे.
जुनैद फारुक याच्याकडून 'हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेच्या महत्त्वपूर्ण कारवायासंदर्भात माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जवानांनी केलीली ही सर्वात मोठी कामगिरी समजली जात आहे. सीआरपीएफच्या जवानांसह बारामुल्ला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (हेही वाचा - जम्मू-काश्मीर: अनंतनाग मध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त)
J&K: Police, Army and CRPF personnel arrested local terrorist Junaid Farooq Pandith of Hizbul Mujahideen. A trap was laid for him in Tapper Pattan in Baramulla district. pic.twitter.com/orB9ojl2fq
— ANI (@ANI) February 22, 2020
दरम्यान, आज जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय जवानांच्या कारवाईत लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. या कारवाईत घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील बिजबेहरा येथील संगम भागात ही चकमक झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून या परिसरात गोळीबार सुरु होता. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.