जम्मू-काश्मीर: अनंतनाग मध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
Indian Army (Photo Credits-IANS)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनाग (Anantnag) येथे भारतीय जवानांच्या कारवाईत लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या कारवाईत घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरमधील बिजबेहरा येथील संगम भागात ही चकमक झाली. आज सकाळी या परिसरातील सुरक्षा दलाला हे मोठं यश हाती आले आहे. मध्यरात्रीपासून या परिसरात गोळीबार सुरु होता. त्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करत ही दमदार कामगिरी केली आहे.

ANI वृत्तसंस्थेने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात सांगितलं की, स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि जवानांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यावेळी घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला.

ANI चे ट्विट:

हेदेखील वाचा- जम्मू-काश्मीर: भारतीय जवानांकडून 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान

संगम भागात झालेल्या या चकमकीत सुरक्षादलानं दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त केलाय. एखादी भयंकर दहशतवादी कृत्य घडवून आणण्याच्या प्रयत्नात हे दहशतवादी असल्याचं यातून समोर येतंय.

या परिसारत रात्रभर सुरु असलेल्या गोळीबाराला अशा पद्धतीने प्रत्युत्तर देणे हे भारतीय जवानांसाठी मोठं यश म्हणावे लागेल. जम्मू-काश्मीर च्या संवेदनशील भागात अहोरात्र तैनात असलेल्या भारतीय जवानांमुळे येथील नागरिक किंबहुना हा संपूर्ण देश शांत झोप घेतो आहे असं म्हटलं तर काही चुकीचे ठरणार नाही.