जम्मू-काश्मीर: भारतीय जवानांकडून 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान
Security forces in Jammu and Kashmir | File image | (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सीमारेषेवर पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. मात्र, भारतीय जवानांनी याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना (Pakistani Terrorists) कंठस्नान घातलं आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील मेंधार सेक्टरमध्ये (Mendhar Sector) ही चकमक झाली. याबाबात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

मेंधार सेक्टरमध्ये 9 फेब्रुवारी रोजी भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत 3 जणांना कंठस्नान घातलं. मेंधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघनही करण्यात आलं होतं. (हेही वाचा - छत्तीसगढः नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या CoBRA बटालियनचे 2 जवान शहीद; 4 जखमी)

दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात 2 स्थानिक नागरिकांसह सीआरपीएफचे 2 जवान गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीच उल्लंघन केलं जात आहे. भारतीय जवान दहशतवाद्यांच्या या कारवाई उधळून लावत आहेत.